जनरल मोटर्सच्या सीईओ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

जगप्रसिद्ध 'जनरल मोटर्स' या अमेरिकन कंपनीने गुजरातचा प्रकल्प बंद करून महाराष्ट्रात तब्बल 6 हजार 400 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Jul 31, 2015, 02:04 PM IST
जनरल मोटर्सच्या सीईओ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला title=

मुंबई : जगप्रसिद्ध 'जनरल मोटर्स' या अमेरिकन कंपनीने गुजरातचा प्रकल्प बंद करून महाराष्ट्रात तब्बल 6 हजार 400 कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय.

पुण्यातल्या तळेगावमधील प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय कंपनीनं घेतलाय. यासंदर्भात जनरल मोटर्स आणि राज्य सरकार यांच्यात करार झालाय. या करारानुसार जनरल मोटर्स राज्यात तब्बल ६ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तर या प्रकल्पामुळे १४०० नोकरीच्या संधी निर्माण होतील, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

गुरुवारी जनरल मोटर्सच्या सीईओ मेरी बॅरा यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली आणि याबाबतची घोषणा केलीय. 

 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात जनरल मोटर्सच्या अमेरिकेतील मुख्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर गुरुवारी जनरल मोटर्सच्या सीईओ मेरी बॅरा यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली आणि याबाबतची घोषणा केलीय.. सध्या जनरल मोटर्सची तळेगावातील वाहन निर्मितीची क्षमता १ लाख ७० हजार युनिट इतकी आहे. ही क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने कंपनीने हे पाऊल उचललंय.. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ३०० एकर जागा ९५ वर्षांच्या कराराने देण्यात आलीय.. त्यामुळे सुमारे १४०० जणांना रोजगार मिळणार आहे. या करारामुळं महाराष्ट्रात येऊन गुंतवणूकदारांना गुजरातला येण्याचं आवाहन करणाऱ्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना जोरदार चपराक बसलीय.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.