मुंबई : आज जागतिक मराठी भाषा दिवस. कविवर्य कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्याचीच आठवण म्हणून आजचा दिवस जागतीक मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, मराठी भाषेचं अभिजातपण हुकलं. सुधारित प्रस्ताव साहित्य अकादमीकडून प्रस्ताव उशीरा पोहचला, आजचा मुहूर्त हुकल्याची सूत्रांची माहिती.
मराठी भाषा दिनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची घोषणा केंद्र सरकार करेल अशी अपेक्षा सर्व मराठी भाषिकांना होती. मात्र मराठी भाषिकांची ही अपेक्षा फोल ठरलीये. दफ्तरी दिरंगाईमुळे मराठीचे 'अभिजात'पण हुकल्याचं समोर येतंय.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी सातत्यानं होतीये. राज्याचे सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे यांनी २७ फेब्रुवारीला दिल्लीत केंद्र सरकार याबाबत घोषणा, करेल असा विश्वासही व्यक्त केला होता. मात्र मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा सुधारीत प्रस्ताव साहित्य अकादमीने आजच सरकारदरबारी पाठवल्याने याबाबत आज कोणतीही घोषणा होणार नसल्याचं कळतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.