मुंबई : अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना काही अचानक घडले तर लगेचच मदत मिळणं शक्य नसत. मात्र एका ट्विटद्वारे आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या सहयोगामुळे रेल्वे प्रवासादरम्यान महिलेला तात्काळ मदत मिळाली. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे नाव नम्रता महाजन असे आहे. एक पुरुष प्रवासी त्रास देत असल्याचे ट्विट तिने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ या महिलेला मदत पुरवली.
शेगांव रेल्वेस्थानकातून प्रवास करत असताना एक पुरुष त्रास देत असल्याचे ट्विटर केले होते. संध्याकाळी सहा वाजून ५९ मिनिटांनी तिने प्रभूंच्या ट्विटर हँडलवर ट्वीट केले. प्लीज ट्रेन नंबर १८०३० मध्ये मदत हवीये. शेगांवर स्थानकातून चढलेला एक पुरुष प्रवासी मला त्रास देतोय. मी ट्रेनमध्ये असून खूप घाबरलेय असे तिने ट्विटर लिहिले होते.
रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी वेद प्रकाश यांनी हे ट्विट पाहिले आणि मदतीसाठी तात्काळ आवश्यक पावले उचलली. जेव्हा ४० मिनिटांत रेल्वे भुसावळ स्टेशनजवळ पोहोचली तेव्हा तेथील आरपीएफच्या जवानांनी महिलेला मदत केल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य पीआरओ नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
@RailMinIndia plz help me plz that man has an arguement with abusive words
— namrata mahajan (@namratamahajan1) November 26, 2015
@namratamahajan1 Please your PNR immediately
— Ministry of Railways (@RailMinIndia) November 26, 2015
@RailMinIndia sir help reached me thanks alot sir
— namrata mahajan (@namratamahajan1) November 26, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.