नगरांपेक्षा प्रगत शहरांत महिलांचं शोषण अधिक

नगरांच्या तुलनेत महानगरांमध्ये तरुण आणि वयस्कर महिला आपल्या वयाच्या पुरुषांच्या तुलनेत अधिक दुर्व्यवहारांचा सामना करतात, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 14, 2014, 07:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नगरांच्या तुलनेत प्रगत शहरांमध्ये तरुण आणि वयस्कर महिला आपल्या वयाच्या पुरुषांच्या तुलनेत अधिक दुर्व्यवहारांचा सामना करतात, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून काढण्यात आलाय.
‘हेल्प एज इंडिया’नं जाहीर केलेल्या एका अहवालानुसार, ५२ टक्के महिलांना धकाधकीच्या जीवनात दुर्व्यवहारांचा सामना करावा लागतो, तर त्यांच्याच वयाच्या ४८ टक्के पुरुष अशा प्रकारच्या दुर्व्यवहारांचा सामना करतात. हे सर्वेक्षण आठ राज्यांतील १२ शहरांमध्ये करण्यात आलंय.
‘हेल्प एज इंडिया’चे सीईओ मॅथ्यूज चेरियन यांच्या म्हणण्यानुसार, या समस्येच्या मुळावरच घात करण्याची गरज आहे. आपल्या मूल्यांमध्ये बदल झाल्यानं ही समस्या दिवसेंदिस वाढत चालल्याचं, त्यांचं म्हणणं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.