दुर्देवी: आंब्याने घेतला महिलेचा जीव

फळांचा राजा आंब्याचा मोह लहाण असो किंवा मोठी व्यक्ती कोणालाच आवरत नाही. आंब्याचा हाच मोह एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. आंबा काढण्यासाठी झाडावर चढलेल्या महिलेचा खाली पडून दुर्दैवी अंत झाला आहे. 

Updated: Apr 25, 2015, 06:10 PM IST
दुर्देवी: आंब्याने घेतला महिलेचा जीव title=

मुंबई: फळांचा राजा आंब्याचा मोह लहाण असो किंवा मोठी व्यक्ती कोणालाच आवरत नाही. आंब्याचा हाच मोह एका महिलेच्या जीवावर बेतला आहे. आंबा काढण्यासाठी झाडावर चढलेल्या महिलेचा खाली पडून दुर्दैवी अंत झाला आहे. 

आंब्याच्या गोडीला कमी करणारी घटना मुंबईत घडली आहे. आंबा खाण्याच्या इच्छेने ४४ वर्षांच्या तारूण हरिष मकवाना यांचा जीव घेतला आहे. त्या कांजूर येथील सीजीएस वसाहतीच राहत होत्या. घरामागे असलेल्या आंब्याच्या झाडावरील आंबे तो़डण्यासाठी त्या झाडावर चढल्या होत्या. मात्र झाडावर पाय घसरून त्या इमारतीच्या सुरक्षा भिंतीवर पडल्या. भिंतीवरील लोखंडी ग्रीलच्या सळ्यांमध्ये अडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रीलच्या सळ्यांमधील मकवाना यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रूग्नालयात पाठवण्यात आला. अनपेक्षीतपणे घडलेल्या या घटनेने मकवाना कुटुंबावर शोककळा पसरली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.