मुंबई : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नेते छगन भुजबळ यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकले आहेत. यानंतर यावर शरद पवार काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या विषयी विचारलं असता, शरद पवार यांनी म्हटलं आहे, "आपण योग्यवेळी या विषयावर बोलू".
तसेच सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. काल काही ठिकाणी कारवाई करण्यात आली. आजही तपास सुरू आहे. त्यामुळे मी आत्ता या विषयावर काही बोलणे योग्य ठरणार नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
मी आत्ता काही बोललो तर उद्या परत तपासावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप माझ्यावर कोणीतरी करेल. त्यामुळे मला जे काही सांगायचे आहे, ते मी योग्यवेळी सांगेन.
महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी गेल्या आठवड्यात छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छगन भुजबळांच्या मुंबई, पुणे, नाशिक, मनमाड आणि येवल्यातील विविध घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.