व्हॉट्सअॅपवर वडिलांनी पाहिला मुलीचा न्यूड व्हिडिओ

शहरात एका मुलीचा न्यूड व्हिडीओ काढून तो व्हॉटस अॅपवर टाकण्याचा गंभीर प्रकार घडलाय, या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे अल्पवयीन आहेत. एकाने या मुलीचा व्हिडीओ व्हॉटस अॅपवर फिरत असल्याची माहिती या मुलीच्या वडिलांना दिली, त्यामुळे हा सर्व प्रकार समोर येण्यास मदत झाली.

Updated: Jan 28, 2015, 05:42 PM IST
व्हॉट्सअॅपवर वडिलांनी पाहिला मुलीचा न्यूड व्हिडिओ title=

मुंबई : शहरात एका मुलीचा न्यूड व्हिडीओ काढून तो व्हॉटस अॅपवर टाकण्याचा गंभीर प्रकार घडलाय, या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे अल्पवयीन आहेत. एकाने या मुलीचा व्हिडीओ व्हॉटस अॅपवर फिरत असल्याची माहिती या मुलीच्या वडिलांना दिली, त्यामुळे हा सर्व प्रकार समोर येण्यास मदत झाली.

या मुलीच्या शेजारी राहणाऱ्या सतरा वर्षाच्या मुलाने हा व्हिडीओ अपलोड केल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं आहे.

आरोपी मुलाने १३ वर्षाच्या मुलीचा आंघोळ करतानाचा हा व्हिडीओ काढला, आणि व्हॉट्सअॅपवर शेअर केला, शिवाय आरोपी दररोज पीडित मुलीचा व्हिडिओ तयार करत होता, अशी माहिती वाकोला पोलिसांनी दिलीय.

 याआधी मुलीच्या वडिलांनी आरोपी मुलाला बाथरुमच्या जवळ पाहिले होते, आणि त्याला हटकलंही होतं. 

व्हिडिओ ज्यांच्या मोबाईवर शेअर केला आहे, त्या सर्वांचे मोबाईल जप्त केले आहेत. शिवाय त्या सर्वांची चौकशी सुरु आहे. पोलिसांना असा संशय आहे की फरार असलेल्या मुख्य आरोपींने आधीही असे प्रकार केले असावेत.

व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलीच्या वडिलांसह नातेवाईकांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.