www.24taas.com, झी माडिया, मुंबई
तात्काळ तिकीटांमध्येही होत असलेली दलालांची घुसखोरी बंद करण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक अनोखा मार्ग काढला आहे.
ज्यांना तात्काळ तिकीट काढायचे आहे, त्यांनी आरक्षणाच्या आदल्या दिवशी 12 वाजल्यापासून आरक्षण केंद्रात आपल्या नावाची नोंद करायची. यासाठी आरक्षण प्रमुखाकडे नाव नोंदवतांना ओळखपत्राची सेल्फ अटेस्टेड कॉपी द्यावी लागेल. तसंच आपल्या नाव, पूर्ण पत्ता, टेलिफोन नंबर आणि हस्ताक्षरासहीत स्वत:ला रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर, पहिल्या २५ जणांचे नाव नोंदवले जाईल त्यांना प्रत्यक्ष तात्काळ तिकीटाच्या आरक्षणाच्या दिवशी प्राधान्याने तेही हमखास आरक्षण दिले जाईल. रजिस्टर करणाऱ्या व्यक्ती दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत येऊन आपलं तत्काळ तिकीट बुक करू शकतील.
अर्थात यासाठी आरक्षण केंद्रावर संबंधितांना लवकर हजर रहावे लागणार आहे. प्रवास करणाऱ्यांचे नाव पुराव्यासह नोंदवले गेल्यानं दलालांच्या घुसखोरीला आळा बसेल असा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.