मुंबई : आप पक्षाने आरोप करावेत आणि नेत्यांनी राजीनामा द्यावा, यात काय तथ्य आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच शिवसेनेने एकनाथ खडसे यांचा राजीनामा मागितला नसल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे, खडसेंचा राजीनामा हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसेंवरचे आरोपांमध्ये तथ्य नसेल तर त्यांनी राजीनामा का द्यावा, किंवा आरोपात तथ्य असेल तर यावरचा निर्णय राज्याची जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मात्र राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वाने यावर निर्णय घ्यावा असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.