मुंबई : पॉर्न वेबसाईटवर पाहण्यावर भारत सरकारने बंदी आणली आहे, यावरून पॉर्न वेबसाईट पाहण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. देशातील कोणत्या राज्यातील व्यक्ती सरासरी पॉर्न पाहण्यासाठी किती, वेळ खर्च करतात याची आकडेवारी पॉर्नहब डॉटकॉमने दिली आहे.
पाहा महाराष्ट्राचा नंबर कितवा?
यात देशात कोणतं राज्य पॉर्न साईट पाहण्यात आघाडीवर होतं, याची आकडेवारी समोर आली आहे. अर्थात यात महाराष्ट्राचा नंबर चौथा आहे. महाराष्ट्रात सरासरी ७ मिनिटे ९१ सेकंद पॉर्न पाहण्यास खर्च होतात.
ईशान्यकडील राज्य आघाडीवर
मिझोरमने सर्वात पहिला नंबर मारला आहे, तर दुसऱ्या नंबरवर दिलवालों की दिल्ली आहे. तिसरा नंबर मेघालयाने पटकावला आहे, महाराष्ट्र या बाबतीत देशात चौथ्या क्रमांकावर आहे.
पॉर्न पाहण्यात ईशान्यकडील राज्य मात्र आघाडीवर आहेत, कारण यात मिझोरम, मेघालय,नगालँड आणि आसामही आघाडीवर आहे. पॉर्नहब डॉटकॉमने ही आकडेवारी दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.