मुंबई: तुम्ही जर घरं घेण्याच्या विचारात असाल, तर हा निर्णय लवकर घ्या, कारण घरांच्या किंमती वाढण्याची शक्यताय.
राज्यात एलबीटी तर रद्द झालाय खरा, पण त्याच्या भरपाईसाठी सरकारनं मुद्रांकांच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं येत्या काही दिवसात घरांच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यताय. राज्याला सध्या मुद्रांक विक्रीतून सुमारे १० हजार कोटींचं उत्पन्न मिळतं.
एलबीटी रद्द झाल्यानं महापालिकांना साधारण २ हजार कोटींची भरपाई करावी लागणार आहे. त्यासाठी मुद्रांकांच्या विक्रीतून भरपाई द्यायची असेल, तर उत्पन्न वाढवावं लागणार आहे.
त्यामुळं एकतर सरकार जमीन आणि घरं खरेदी विक्रीवरची स्टँम्प ड्युटी वाढवून सरकार ही भरपाई करण्याची चिन्हं असल्याचं वृत्त झी मीडियाचं सहकारी वृत्त पत्र डीएनएनं दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.