केईएमचा वॉर्ड-4 अरुणाची आठवण म्हणून जतन करणार

1973पासून मृत्यूला झुलवत ठेवणारी अरुणा शानबाग मरणानंतरही जिवंत राहणार आहे. पोटच्या मुलीप्रमाणे अरुणाचा सांभाळ करणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या परिचारिकांनी तिच्या आठवणी चिरंतन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: May 19, 2015, 12:58 PM IST
केईएमचा वॉर्ड-4 अरुणाची आठवण म्हणून जतन करणार title=

मुंबई: 1973पासून मृत्यूला झुलवत ठेवणारी अरुणा शानबाग मरणानंतरही जिवंत राहणार आहे. पोटच्या मुलीप्रमाणे अरुणाचा सांभाळ करणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या परिचारिकांनी तिच्या आठवणी चिरंतन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

तिच्यावर उपचार सुरू असलेल्या केईएम रुग्णालयाच्या वॉर्ड-4 मध्येच या आठवणी जपण्यात येणार आहेत. याबाबत लवकरच महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती केईएमचे अधिष्ठाते डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. 

अरूणा आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या अनेक आठवणी या खोलीत दडल्या आहेत. तब्बल 42 वर्षांनंतर पहिल्यांदाच या खोलीला सोमवारी टाळे लागले आहे. मात्र हे टाळे पुन्हा उघडण्याचा रुग्णालयातील परिचारिकांचा मानस आहे. 

सुरुवातीच्या काळात अरुणावरील उपचार थांबवून तिला दुसरीकडे हलविण्याचा विचार करण्यात आला होता, मात्र त्याविरोधात परिचारिकांनी आंदोलन करून हा निर्णय रद्द करण्यास रुग्णालय प्रशासनाला भाग पाडले होते. तेव्हापासून अरुणा आणि त्या खोलीचे अबोल नातेच जुळले होते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.