www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईत लवकरच मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या मार्गातले सगळे अडथळे दूर झालेत. मेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र मिळालंय. आता रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची औपचारिकता फक्त शिल्लक आहे.
सुरक्षेचे प्रमाणपत्र मिळाल्यानं आता एका आठवड्याच्या आत मुंबईत मेट्रो धावण्याची शक्यता वर्तवली जातंय. अकरा डेडलाईन चुकल्यानंतर अखेर मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय. मोनोनंतर आता मेट्रोही सुरु होणार असल्यानं मुंबईकरांचा प्रवास काही प्रमाणात तरी सुखकर होणार आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या 11.4 किलोमीटरच्या मार्गावर मुंबईतील पहिली मेट्रो धावणार असून यामध्ये एकूण 12 स्टेशन असणार आहेत. वर्सोवा ते घाटकोपर हे अंतर अवघ्या 21 मिनिटांत मेट्रोच्या माध्यमातून पूर्ण करणं शक्य होणार आहे. बस किंवा टॅक्सीनं हे अंतर पार करण्यासाठी तब्बल दीड ते दोन तास वेळ लागतो.
2014 या वर्षी मुंबईचा स्पीड आणखी वाढलाय. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये मोनो मुंबईच्या ट्रॅकवर धावायला लागली. तर आता मेट्रोला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लवकरच मेट्रोही मुंबईत धावायला लागणार आहे. मेट्रोचा पहिला अंधेरी ते घाटकोपर हा टप्पा सुरू होणार आहे. सध्या या प्रवासाला दीड तास लागतो. आता मेट्रोमधून हा प्रवास फक्त २० मिनिटांत होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.