भारतात परतण्यासाठी मल्ल्यांच्या २ अटी

 आर्थिक संकटात सापडेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी भारतात येण्यासाठी दोन अटी ठेवल्या आहेत, आपल्याला सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी मिळाली तरच देशात परतू असं विजय मल्ल्या यांनी म्हटलं आहे, तर स्टेट बँकेसमोर त्यांनी नवा तडजोडीचा प्रस्तावदेखील ठेवलाय. 

Updated: May 16, 2016, 09:31 PM IST
भारतात परतण्यासाठी मल्ल्यांच्या २ अटी title=

मुंबई :  आर्थिक संकटात सापडेलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी भारतात येण्यासाठी दोन अटी ठेवल्या आहेत, आपल्याला सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी मिळाली तरच देशात परतू असं विजय मल्ल्या यांनी म्हटलं आहे, तर स्टेट बँकेसमोर त्यांनी नवा तडजोडीचा प्रस्तावदेखील ठेवलाय. 

मुंबईत झालेल्या बैठकीला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत उपस्थिती लावली. युनायटेड ब्रुअरीजचे संचालक आणि हेनेकेनने मल्ल्यांना संपूर्ण पाठिंबा दर्शविला. मल्ल्यांनी शुक्रवारी युनायटेड ब्रुअरीजच्या संचालकांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. 

मल्ल्या बँकांचे कर्ज फेडण्यास तयार आहेत, ते बँकांशी याविषयी गांभीर्याने चर्चा करीत आहेत. त्यांची भारतात परत येऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी आहे. परंतू त्यासाठी सुरक्षा आणि स्वातंत्र्याची हमी त्यांनी मागितली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

बँकांचे सुमारे ९ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकवून लंडनमध्ये स्थिरावलेल्या मल्ल्यांना भारतात परत आणण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचेप्रयत्न सुरु आहेत.