हार्बर आणि सेन्ट्रल रेल्वेचा 'मेगाब्लॉक' रद्द

सीएसटीजवळ लोकलचे दोन डबे घसरल्याने, हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. म्हणून हार्बर आणि सेंट्रल मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. प्लॅट फॉर्म क्रमांक दोनवर हा अपघात झाला आहे. लोकल प्लॅटफॉर्मवर येत होती तेव्हा हा अपघात झाला. 

Updated: Sep 14, 2014, 04:59 PM IST
हार्बर आणि सेन्ट्रल रेल्वेचा 'मेगाब्लॉक' रद्द title=

मुंबई : सीएसटीजवळ लोकलचे दोन डबे घसरल्याने, हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. म्हणून हार्बर आणि सेंट्रल मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत. प्लॅट फॉर्म क्रमांक दोनवर हा अपघात झाला आहे. लोकल प्लॅटफॉर्मवर येत होती तेव्हा हा अपघात झाला. 

यानंतर सीएसटी प्लॅट फॉर्म क्रमांक दोनवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व गाड्या प्लॅट फॉर्म नंबर तीनवरून वळवण्यात आल्या आहेत. आज रविवार असल्याने लोकलला एवढी गर्दी नाही. मात्र गर्दीच्या वेळेत या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांचे हाल झाले असते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.