विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत टक्कर

विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी असा आघाडीमध्येच थेट सामना रंगणार आहे.

Updated: Aug 11, 2014, 11:28 PM IST
विधान परिषदेच्या एका जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत टक्कर title=

मुंबई : विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी असा आघाडीमध्येच थेट सामना रंगणार आहे.

या जागेसाठी काँग्रेसच्या वतीनं माजी आमदार मोहन जोशी यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

शिवसेनेकडून मात्र कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळं आता एका जागेसाठी काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगणार आहे.

तटकरे यांनी विधानसभेच्या आमदारकीचाही राजीनामा दिल्यानं, ते आता माघार घेणार नाहीत, हे स्पष्ट आहे. तर चर्चेतून मार्ग काढू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय.

शिवसेनेचे विनायक राऊत खासदार झाल्यानं त्यांच्या रिक्त जागेसाठी विधान परिषदेची ही पोटनिवडणूक होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.