पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही.

Updated: Feb 12, 2016, 02:44 PM IST
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नाही title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आयोजित मेक इन इंडिया या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. १३ फ्रेबुवारीला एक भव्य भोजनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला आहे.

बांद्रा-कुर्ला कॉम्पलॅक्सच्या एमएमआरडीए मैदानात आयोजन करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विदेशातील जवळपास ८०० लोकांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी, उद्योगपती, सरकारी अधिकारी आणि काही नेते उपस्थित राहणार आहेत. 

उद्धव ठाकरे यांना मात्र या भोजनासाठी आमंत्रण नसल्याने काही शिवसैनिकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. एका शिवसैनिकांने म्हटलं की, 'वेळ आता बदलला आहे, अटलजींच्या काळात बाळासाहेबांना आमंत्रण असायचं आणि पंतप्रधान आणि बाळासाहेब एकत्र जेवायचे.'

उद्धव ठाकरे हे १८ फेब्रुवारीला होणाऱ्या पॅनल चर्चेत उपस्थित राहणार आहे. 15 फेब्रुवारीला होणाऱ्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे असणार आहेत.

याआधीही भाजपकडून इंदूमिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी उद्धव यांना आमंत्रण दिलं नव्हतं. शपथविधीला देखील ऐनवेळी मनधरनी करुन उद्धव यांना कार्यक्रमास बोलावण्यात आलं होतं.