मुंबई : शिवसेना भाजपमध्ये चांगला समन्वय असल्याचं शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावं लागलं. मात्र हे स्पष्ट करतानाच या दोन पक्षात एक समन्वय समितीही येत्या तीन दिवसांत स्थापन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी विशेषतः पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांवर तिखट टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपला बाळकडू पाजण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावर बोलण्याचं मुख्यमंत्र्यांनी टाळलं. 'सामना'तल्या टीकेवर मात्र त्यांनी उपहासात्मक प्रतिक्रिय़ा दिली.
गेल्या काही दिवासांमध्ये भाजप-शिवसेनेमध्ये जाहीर टीका होताना दिसत होती. रामदास कदम यांच्या टीकेला महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जशासतसे उत्तर दिले होते. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांतील वाद शिगेला पोहोचला होता. सत्तेत सहभागी असताना शिवसेनेने भाजपला टार्गेट केल्याने चुकीचा संदेश जात होता. यावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. आमच्यात चांगला समन्वय असल्याचे म्हटले. मात्र, समिती स्थापन करण्याचे स्पष्ट केले.
या आधी उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे आधीच म्हटले होते. आता मुख्यमंत्र्यांनीही समितीबाबत स्पष्टकरण दिल्याने समन्वायासाठी आता समिती काम करणार असल्याचे स्पष्ट झालेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.