#meatban वर भडकले TWITTER यूजर्स, मुंबईला म्हटलं Ban-istan

मीरा-भाईंदर महापालिकेनं जैन धर्मियांच्या पर्युषन काळात मांसविक्रीवर बंदी घातलीय. तर बीएमसीनंही चार दिवसांसाठी अशी बंदी घातलीय. 

Updated: Sep 8, 2015, 01:07 PM IST
#meatban वर भडकले TWITTER यूजर्स, मुंबईला म्हटलं Ban-istan title=

मुंबई: मीरा-भाईंदर महापालिकेनं जैन धर्मियांच्या पर्युषन काळात मांसविक्रीवर बंदी घातलीय. तर बीएमसीनंही चार दिवसांसाठी अशी बंदी घातलीय. 

त्यामुळं लोकांचा संताप झालाय. #meatban या हॅशटॅगसह ट्विटरवर यूजर्सनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केलीय. मुंबईला Ban-istan म्हणत मांसविक्री बंदीचा निषेध केलाय.

बीएमसी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत १०,१३,१७ आणि १८ सप्टेंबरला देवदारचा कत्तलखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तर मीरा-भाईंदर महापालिकेनं पर्युषण काळात मांसविक्रीवरच बंदी घातलीय. मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निर्णयाचा विरोध करत आहेत. तर दुकानदारांनीही इतके दिवस दुकान बंद राहिलं तर त्यांचं नुकसान होईल, असं म्हटलंय. 

आणखी वाचा - 'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.