OMG! ४२५ कोटींचं मुंबईतील सर्वात महागडं घर कुमार बिर्ला घेणार

देशातील प्रसिद्ध बिझनेसमन कुमार मंगलम बिर्ला यांनी मुंबईतील एका बंगल्याची ४२५ कोटी रुपयांची बोली लावलीय. मलबार हिल परिसरातील 'जाटिया हाऊस' साठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी बोली आहे. 

Updated: Sep 8, 2015, 11:29 AM IST
OMG! ४२५ कोटींचं मुंबईतील सर्वात महागडं घर कुमार बिर्ला घेणार  title=

मुंबई: देशातील प्रसिद्ध बिझनेसमन कुमार मंगलम बिर्ला यांनी मुंबईतील एका बंगल्याची ४२५ कोटी रुपयांची बोली लावलीय. मलबार हिल परिसरातील 'जाटिया हाऊस' साठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी बोली आहे. 

रिअल इस्टेट मार्केटमधील सूत्रांनुसार, मुंबईत बंगल्यासाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी डिल असेल. मागील आठवड्यात जेव्हा लिलाव सुरू झाला तेव्हा चार बिडर होते. यात मुंबईतील दन आणि दिल्लीतील एक बिझनेसमन सोबत एक डेव्हलपर पण होते. डिलसाठी ग्लोबल प्रॉपर्टी कंसल्टंट जेएलएल इंडिया मध्यस्थी करत आहेत. 

कंपनीनं अजून काही सांगितलं नसलं तरी आदित्य बिर्ला ग्रुपच्या एका प्रवक्त्यानं हे सांगितलं. कुमार मंगलम बिर्ला हे बिर्ला ग्रुपचे चेअरमन आहेत. ते सध्या कार्मिछिल रोड एनक्लेवमध्ये तीन स्टोरी इमारतीत आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. बिर्ला जाटिया हाऊसला रि-डेव्हलप करणार नसल्याचंही कळतंय. ते त्या बंगल्यातच राहतील.

कसं आहे जाटिया हाऊस?

जाटिया हाऊस ३० हजार स्क्वेअर फूट परिसरात वसलेला दोन मजली बंगला आहे. हा बंगला १ एकर पेक्षा थोडा कमी असेल. बंगला १९५०मध्ये बांधण्यात आला. एमपी जाटिया ग्रुप ऑफ कंपनीजच्या पद्ममजी पल्प आणि पेपर मिल्स लिमिटेडचे अरुण - श्याम जाटिया या बंगल्याचे मालक आहेत. या डीलबद्दल माहिती असणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं, 'मागील दोन वर्षांपासून जाटिया ब्रदर्संना ही प्रॉपर्टी विकायची होती. गेल्या वर्षी एका प्रॉपर्टी डेव्हलपरकडून देणं-घेणं जवळजवळ पूर्ण झालं होतं. मात्र रेग्युलेटरी इश्यूजमुळे ती विक्री थांबली.'

का विकला जातोय बंगला?

जाटिया यांचं कुटुंब गेल्या चार दशकांपासून या बंगल्यात राहत आहेत. आता ते इतक्या मोठ्या प्रॉपर्टीची योग्य देखरेख करू शकत नाहीत, असं सांगण्यात येतंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जाटिया फॅमिलीतील अधिकाधिक सदस्य दुसरीकडे गेले आहेत. जे उरले आहेत त्यांच्यासाठी हा बंगला खूप मोठा आहे.' 
एका इंग्रजी वर्तमानपत्रातील बातमीनुसार अमित जाटिया यांनी गेल्या वर्षी १७५ कोटींना नेपेन सी रोडवर तीन मजली इमारत रजाक हॅवेन विकत घेतलीय. 

कुणाचे शेजारी होतील?

जर ही डिल झाली तर बिर्ला मलबार हिलवर मेहेरनगिर बंगल्यात राहणाऱ्यांचे शेजारी होती. भारतात अॅटोमिक एनर्जी प्रोग्रामचे जनक होमी भाभा कधी काळी याच बंगल्यात राहत होते. गेल्या वर्षी १७१५० स्क्वेअर फूट ही प्रॉपर्टी बिझनेसमन जमशेद गोदरेज यांची बहिण स्मिता कृष्णा यांनी ३७२ कोटींना विकत घेतला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.