एसी लोकल याच महिन्यात ट्रान्स हार्बर मार्गावर

मुंबईकरांसाठी मच अवेटेड ठरलेली एसी लोकल अखेर १६ एप्रिलपासून ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे.

Updated: Apr 1, 2016, 03:35 PM IST
एसी लोकल याच महिन्यात ट्रान्स हार्बर मार्गावर title=

मुंबई : मुंबईकरांसाठी मच अवेटेड ठरलेली एसी लोकल अखेर १६ एप्रिलपासून ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीय. चेनेनईहून ही लोकल मुंबईत पाठवण्यात आलीय. एसी लोकल बाबतीत याआधी तारीख पे तारीख असा सिलसिला सुरू होता. 

आधी ही लोकल पश्चिम रेल्वेच्या मार्गावर धावणार होती. पण नंतर तांत्रिक कारणांमुळे ही लोकल ट्रान्स हार्बर मार्गावर धावेल, असा निर्णय झाला. 

एकंदरीतच मुंबईकरांच्या एसी लोकलचा हा प्रवास पाहता आता ही नवी १६ तारखेची डेडलाईन एप्रिल फूल ठरणार नाही, अशी अपेक्षा आहे.