धार्मिक स्थळांवर भेदभाव नकोच, मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले

धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावले.

Updated: Apr 1, 2016, 03:00 PM IST
धार्मिक स्थळांवर भेदभाव नकोच, मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले title=

मुंबई : धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावले.

शनिशिंगणापूर इथल्या चौथ-यावर महिलांना प्रवेशबंदी आहे. त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना, न्यायालयानं हे स्पष्ट निर्देश दिले. प्रवेशावरुन स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करता येणार नाही, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.  

तर पूजेचा अधिकार सर्वांना आहे. त्यानुसार राज्यात कुठेही भेदभाव होणार नाही अशी भूमिका, राज्य सरकारनं न्यायालयात मांडली. सरकारनेच ६० वर्षांपूर्वी कायदा केलेला आहे. त्यामुळे त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सरकारचीच असल्याचे न्यायालयाने सुनावले होते.