मालवणीतील विषारी दारुचे ८२ बळी

मुंबईतील मालवणी येथील विषारी दारू प्राशन करणाऱ्यांचा बळींचा आकडा वाढतच आहे. शनिवारी या बळींची संख्या ८२ वर पोहोचली आहे.

Updated: Jun 20, 2015, 02:45 PM IST
मालवणीतील विषारी दारुचे ८२ बळी title=

मुंबई : मुंबईतील मालवणी येथील विषारी दारू प्राशन करणाऱ्यांचा बळींचा आकडा वाढतच आहे. शनिवारी या बळींची संख्या ८२ वर पोहोचली आहे.

अत्यवस्थ असलेले २१ जण अजूनही विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आजचा उपचार घेत असलेल्यांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या चार अधिकाऱ्यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. यामध्ये उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक जगदीश देशमुख, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, एक महिला कॉन्स्टेबल आणि धनाजी दळवी यांचा समावेश आहे. 

याआधी पोलीस आयुक्तांनी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह आठ पोलिसांना निलंबित केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.