कॉलगर्लसाठी बायकोला तलाक देणार होता टायगर मेमन

 १२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या सीरिअल बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला आज फाशी देण्यात आली. या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि याकूबचा भाऊ टायगर मेमन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

Updated: Jul 30, 2015, 02:35 PM IST
कॉलगर्लसाठी बायकोला तलाक देणार होता टायगर मेमन title=

मुंबई :  १२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या सीरिअल बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला आज फाशी देण्यात आली. या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि याकूबचा भाऊ टायगर मेमन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

या सिरिअल ब्लाटमागे मास्टर माइंड याकूब आणि त्याचा भाऊ टायगर मेमन याचा हात होता. ब्लास्टनंतर याकूब पकडला गेला पण त्याचा भाऊ आजही फरार आहे. 

टायगर मेमन याच्या संदर्भातील काही गोष्टी 

पहिल्यादा कॉलगर्लशी भेटला होता टायगर मेमन

ब्लास्ट पूर्वी टायगर मुंबईतील वेगवेगळ्या वेश्यागृहात जात होता. त्या दरम्यान त्याची ओळख एका कॉलगर्लशी झाली. या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले. टायगर कॉलगर्लच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की त्याने अनेक महिने स्मग्लिंगचा धंदा सोडला होता. तसेच तो आपल्या पत्नीलाही तलाख देण्याचा विचारात होता. 

टायगर, कॉलगर्ल आणि तो 
टायगर शिवाय कॉलगर्लवर किशन नावाचा एक व्यक्तीही प्रेम करत होता. पण किशनला टायगर आणि कॉलगर्लच्या संबंधाबद्दल माहीत नव्हते. जेव्हा टायगर आणि कॉलगर्लच्या संबंधाबद्दल किशनला माहित पडले तेव्हा किशनने तिच्यासमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेने कॉलगर्ल घाबरली. त्यानंतर तिने टायगरपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान सिरीअल ब्लास्ट झाले आणि टायगर दुबईत पळून गेला. 

बॉम्बने भरलेल्या गाडीत मिळाला कॉलगर्लचा पत्ता 
१२ मार्च १९९३ मध्ये पहिला स्फोट मुंबई शेअर बाजाराजवळ झाला. त्यानंतर एकानंतर एक १२ स्फोट झाले. यात एक वरळी सेंच्युरी बाजार येथे झाला. योगायोगाने सेंच्युरी बाजार येथे स्फोट झाला त्यावेळी हत्यार आणि स्फोटकांनी भरलेली कार तेथून जात होती. या कारमध्ये बसलेल्या व्यक्तींना बीएमसीवर हल्ला करण्याचे टार्गेट दिले होते. त्यामुळे सर्व जण सीएसटीकडे जात होते. वरळीतील ब्लास्टचा आवाज ऐकल्यावर कारमधील लोग कार सोडून पळून गेले. मुंबई पोलिसांनी ही कार ताब्यात घेतली त्यावेळी ही कार त्या कॉलगर्लच्या नावावर असल्याचे उघड झाले आणि ही महिला वांद्र्यात कॉ़लगर्ल आहे. 

कॉलगर्लने उघड केले टायगरचे गुपीतं

गाडी सापडल्यानंतर जेव्हा कॉलगर्लला पकडण्यात आले. त्यावेळी साखळी स्फोटासंबधी अनेक गुपीतं या कॉलगर्लने ओपन केले. त्यानंतर असगर मुकादमचे नाव समोर आले. पोलिसांनी पहिला आरोपी असगर मुकादमला पकडले. त्यानंतर या प्रकरणाचे एक एक पदर उलगडत गेले आणि अनेक आरोपी क्राइम ब्रांचच्या ताब्यात आलेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.