मुंबई : बिहारमध्ये भाजपला पर्यायानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शह देण्यासाठी विरोधक एकटवले आहेत. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचीही भर पडण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. पाटणा इथे आजपासून पक्षाचं सहावं अधिवेशन होतंय.
दोन दिवसांच्या या अधिवेशनात विविध राज्यांतून एकूण ७०० प्रतिनिधी उपस्थित आहेत. आम्ही जास्त जागा मागणार नाही, परंतु ज्या ठिकाणी आमची ताकद आहे, जिंकून येऊ, त्या जागा नक्कीच मागू, असं पवार यांनी म्हटलंय.
दरम्यान, अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.