हार्बर १२ डब्यांची लोकल अखेर धावली

हार्बर लाईनच्या प्रवाशांना अखेर आजपासून १२ डब्यांच्या गाड्या सुरू झाल्यात. सकाळी सहा वाजता १२ डब्यांची पहिली लोकल वाशीहून वडाळ्याकडे सुटली. 

Updated: Apr 29, 2016, 11:32 AM IST
हार्बर १२ डब्यांची लोकल अखेर धावली title=

मुंबई : हार्बर लाईनच्या प्रवाशांना अखेर आजपासून १२ डब्यांच्या गाड्या सुरू झाल्यात. सकाळी सहा वाजता १२ डब्यांची पहिली लोकल वाशीहून वडाळ्याकडे सुटली. 

वाशी ते वडळा आणि पनवेल ते सीएसटी दरम्यान १४ फेऱ्या करण्यात येणार आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वे सर्व गाड्या १२ डब्ब्यांच्या आहेत. आता हार्बरवरही या गाड्या सुरू झाल्यानं गर्दीमध्ये ३३ टक्के गर्दी कमी होईल, असं असा अंदाज आहे.

हार्बरवरील पहिलीवहिली १२ डब्यांची लोकल आजपासून धावली. मात्र सुरुवातीला एकच लोकल हार्बर मार्गावर धावणार आहे. त्यानंतर या लोकलच्या दिवसभरात १४ फेऱ्या चालविल्या जातील, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकच लोकल चालविण्यात काय अर्थ असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

पहिल्या १२ डब्याच्या लोकलचे वेळापत्रक 

- वाशी ते वडाळा - सकाळी ६ वा. 
- वडाळा ते पनवेल - सकाळी ६.४२ वा.
पनवेल ते वडाळा - सकाळी ७.५६ वा.
वडाळा ते वाशी - सकाळी ९.०७ वा.
वाशी ते सीएसटी - सकाळी ९.४३ वा.
सीएसटी ते पनवेल - सकाळी १०.३५ वा.
पनवेल ते सीएसटी - दुपारी १२.०६ वा.
सीएसटी ते पनवेल - दुपारी १.२८ वा.
पनवेल ते सीएसटी - दुपारी २.५७ वा.
सीएसटी ते पनवेल - संध्याकाळी ४.२३ वा.
पनवेल ते सीएसटी - संध्याकाळी ५.५८ वा.
सीएसटी ते पनवेल - रात्री ७.२० वा.
पनवेल ते सीएसटी - रात्री ८.४७ वा.
सीएसटी ते वाशी - रात्री १०.१० वा.