शिक्षकांनी शिक्षा केल्याने तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

शिक्षकांनी शिक्षा केल्याने विरारमधील तीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या मागे असलेल्या नदीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी बेपत्ता होते. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे. 

Updated: Aug 27, 2014, 01:20 PM IST
शिक्षकांनी शिक्षा केल्याने तीन विद्यार्थ्यांची आत्महत्या title=

मुंबई : शिक्षकांनी शिक्षा केल्याने विरारमधील तीन विद्यार्थ्यांनी शाळेच्या मागे असलेल्या नदीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी बेपत्ता होते. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली आहे. 

तिघेही ही अल्पवयीन विरारच्या एका गुरुकुल इंटरनॅशनल शाळेचे विद्यार्थी आहेत. ते नववीत शिकत होते. हे विद्यार्थी 25 ऑगस्टपासून बेपत्ता होते. आज या तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह नदीत तरंगताना दिसून आलेत. 

तीनही विद्यार्थी शाळेतील हॉस्टेलमध्ये राहत होते. तीन दिवसांपासून बेपत्ता झाल्यानंतर विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान, मुलांचा नदीत पाय घसरुन बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मात्र शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.