जीएसटीचा मसुदा दाखवण्यावर तटकरेंचा आक्षेप

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीचा मसुदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवण्याला, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 10, 2017, 04:37 PM IST
जीएसटीचा मसुदा दाखवण्यावर तटकरेंचा आक्षेप title=

मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीचा मसुदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवण्याला, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतला आहे. 

जीएसटीसंबंधी बोलावल्या जाणाऱ्या विशेष अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं, सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. विधिमंडळात जीएसटी विधेयक संमत केलं जाणार आहे. 

विधिमंडळ सदस्यांना हा मसुदा अधिवेशनाच्या दिवशीच मिळणार आहे. मात्र त्या आधीच एका पक्षाच्या प्रमुखांना अशा प्रकारे मसुदा दाखवणं असंवैधानिक असल्याचं, तटकरे म्हणाले. शिवसेनेच्या टेकूवर राज्य सरकार टिकलं आहे. 

शिवसेना टेकू काढेल या भीतीतूनच, अर्थमंत्र्यांनी ही कृती केल्याचा आरोप तटकरेंनी केला.