गोदरेज कन्युझ्युमरची कमान 39 वर्षीय निसाबाच्या हाती

गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदी गोदरेज यांनी गोदरेज कन्युझ्युमर प्रॉडक्ट्सची जबाबदारी त्यांच्या कन्या निसाबा गोदरेज यांच्या खांद्यावर टाकलीय. निसाबा आजपासून गोदरेज कन्झुमर प्रॉडक्ट्सच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 10, 2017, 01:10 PM IST
गोदरेज कन्युझ्युमरची कमान 39 वर्षीय निसाबाच्या हाती title=

मुंबई : गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदी गोदरेज यांनी गोदरेज कन्युझ्युमर प्रॉडक्ट्सची जबाबदारी त्यांच्या कन्या निसाबा गोदरेज यांच्या खांद्यावर टाकलीय. निसाबा आजपासून गोदरेज कन्झुमर प्रॉडक्ट्सच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.

निसाबा यांच्या हाती आलेली कंपनी गोदरेज ग्रुपची सर्वात महत्वाची कंपनी आहे. 39 वर्षीय निसाबा गोदरेज सारख्या बड्या उद्योग समूहाच्या सर्वोच्चपदी पोहोचलेली सर्वात तरुण महिला आहे. 

सध्या निसाबा कंपनीच्या कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहेत. आज त्या निसाबा आपल्या पदाचाभार स्वीकारणार आहेत. आदी गोदरेज यांना तीन मुल आहेत. 

निसाबांची मोठी बहीण तान्या दुबाश या गोदरेज ग्रुपच्या कार्यकारी संचालक आणि ग्रुपच्या ब्रँड अधिकारी आहेत. आदी गोदरेज यांचे सर्वात लहान पुत्र पिरोजा गोदरेज गोदरेज प्रॉपर्टीज् चे कार्यकारी अध्यक्ष आहेत.