ताओचे यांचे सर्वाधिक वयोवृद्ध योगा टिचर म्हणून गिनीज बुकमध्ये नाव

ताओ पोर्शन लिंच...उत्स्फूर्त ऊर्जा...ऊर्जेचा ज्वालामुखी...आणखी काय काय विशेषणे द्यावीत हिला...ही षोडशवर्षीयांची ऊर्जा असणारी ताओ. 

Updated: Jan 1, 2016, 01:06 PM IST
ताओचे यांचे सर्वाधिक वयोवृद्ध योगा टिचर म्हणून गिनीज बुकमध्ये नाव title=

मुंबई : ताओ पोर्शन लिंच...उत्स्फूर्त ऊर्जा...ऊर्जेचा ज्वालामुखी...आणखी काय काय विशेषणे द्यावीत हिला...ही षोडशवर्षीयांची ऊर्जा असणारी ताओ. वय वर्ष 97..ताओ रोज 2 तास योगासने करते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये ताओचं नाव सर्वाधिक वयोवृद्ध योगा टिचर म्हणून लिहीलं गेलं. ताओचे आतापर्यंत अनेक ऑपरेशन्स झालेत ती आता योग करू शकणार नाही असं तिच्या डॉक्टरांनी सांगितलं. पण तिनं डॉक्टरांचं बोलणं खोटं ठरवलं.

ताओचा जन्म पाँडिचेरीमधला. न्युयॉर्कमध्ये त्या एका योग संस्थेच्या संस्थापक आहेत. असं कुठलंच क्षेत्र नाही जिथे ताओची मुशाफिरी नसेल. डान्स, ऍक्टिंग, मॉडलिंग आणि बरचं काही...

ताओनं अमेरिकाज् गॉट टॅलेंट शोमध्ये २६ वर्षीय पार्टनरसोबत डान्स केला तेव्हा सर्वांची तोडं चाट पडली. फक्त कला क्षेत्रच नाही तर सामाजिक क्षेत्रातही ताओचं योगदान आहे. महात्मागांधींसोबत दोन वेळा मार्चमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या. चौदाव्या दलाई लामांसोबत त्यांनी स्टेज शेअर केलाय. 

हे सगळं ऐकून पाहून ताओ कोनसी चक्कीका आटा खाती है असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात निर्माण झाला असेलं. तुमचा विश्वास बसणार नाही पण ताओनं वया्च्या पंचाहत्तराव्या वर्षापासून पाणी प्यायलेलच नाही. फक्त ज्यूस पितात. पूर्णत: शाकाहारी भोजन त्या घेतात. अधेमधे चहाचा आस्वादही ताओ घेतात.... आणि ताओची ही ऊर्जा पाहुन तुम्हीही निश्चितच अचंबित झाले असाल.