मुंबई : स्वाइन फ्लूचा राज्यात वेगाने फैलाव सुरुच आहे. स्वाइन फ्लूचे राज्यात ९६ नवे रुग्ण सापडलेत. राज्यात आतापर्यंत २ हजार ३९६ जणांना स्वाईन फअलूची लागण झाली असून स्वाइन फ्लूनं आतापर्यंत २०१ बळी घेतले आहेत.
राज्यात स्वाइन फ्लू वेगानं पसरतोय. राज्यात स्वाइन फ्लूचे ९६ नवे रुग्ण आढळले असून स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या स्वाइन फ्लूचे राज्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या २ हजार ३९६ वर गेलीये. आतापर्यंत राज्यात स्वाइन फ्लूनं एकूण २०१ जणांचा बळी घेतलाय तर १०३ रुग्णांवर यशस्वी करण्यात आलेत.
१ जानेवारी पासून आजपर्यंत राज्यात २ लाख २७ हजार ८८५ स्वाईन फ्लू सदृश्य रुग्णांची तपासणी करण्यात आलीये. त्यापैकी २४ हजार २७० रुग्णांना ऑसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आलंय. गुजरातमध्ये स्वाइन फ्लूचे ५ हजार २३६ रूग्ण आढळले आहेत.
तर राजस्थानमधील स्वाइन फ्लूच्या रूग्णांची संख्या सर्वाधिक ५ हजार ८५६ इतकी झाली आहे. कर्नाटकमध्ये १ हजार ६०२ स्वाइन फ्लूचे पेशंट आहेत. राज्यात स्वाईन फ्लूचा सर्वाधिक प्रभाव नागपूरात आढळून येतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.