लाखोंचा गंडा घालणाऱ्या सुरेश यादवला अटक

लोकांना लाखोंचा गंडा घालणा-या सुरेश लल्लु यादव याला मुंबईतल्या साकीनाका पोलिसांनी अटक केलीय. 

Updated: Jul 17, 2016, 11:36 AM IST
लाखोंचा गंडा घालणाऱ्या सुरेश यादवला अटक title=

मुंबई : लोकांना लाखोंचा गंडा घालणा-या सुरेश लल्लु यादव याला मुंबईतल्या साकीनाका पोलिसांनी अटक केलीय. सुरेश फक्त दहावी शिकलेला असूनही त्यानं मुंबई आणि उत्तरप्रदेशातल्या मोठं मोठ्या अधिकारी आणि पोलिसांनाही लाखोंचा गंडा घातलाय. 

साकीनाका परिसरात साकी विहार कॉम्प्लेक्समध्ये सुरेश वॉचमॅनची नोकरी करायचा. तिथेच राहणा-या मोहम्मद आरिफ खान या व्यायवसायिकाला सुरेशन आपण आयएएस अधिकारी असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेशातल्या काही नेत्यांवर कारवाई केल्यानं आपल्याला निलंबित केल्याचं मोहम्मद खान यांना त्यानं सांगितलं. 

हळूहळू मोहम्मद खान यांचा विश्वास त्यानं संपादित केला. सर्वोच्च न्यायालातून बोलत असल्याचं सांगून सुरेश यादव केस जिंकल्याचा निरोप त्यांना द्या आणि पुन्हा नोकरीवर रुजू व्हायला सांगा असे बनावट फोनही त्यानं केला. 

पोलीस स्टेशनमधून, सचिवालयातून बोलत असल्याचे सांगूनही त्यानं फोन केला. त्यामुळं मोहम्मद यांचा सुरेश यादव यांचावर आणखी विश्वास दृढ झाला. या विश्वासापोटी मोहम्मद यांनी सुरेशला सुमारे 17 लाख अडतीस हजार रुपये दिले. त्यानंतर सुरेश फरार झाला. अशाच प्रकारे त्यांनं मुंबईतल्या दहिसर, विक्रोळी बोरिवली, मीरारोड या भागातल्या लोकांना लाखोंचा गंडा घातलाय.