www.24taas.com, मुंबई
सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय आणि सहाराचे तीन वरिष्ठ अधिकारी सेबीसमोर हजर झाले आहेत. सहारामधल्या गुंतवणूकदारांचे तब्बल २४ हजार कोटी परत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
सेबीनं सुब्रतो रॉय यांना समन्स बजावलं होतं. सहारा इंडिया रिअल इस्टेट आणि सहारा हाऊसिंग इनव्हेस्टमेंट या दोन कंपन्यांचे चार संचालक आज सेबीसमोर हजर झाले. या चौघांनाही कंपनीची मालमत्ता आणि खाजगी मालमत्तेची माहिती सादर करण्यास सांगण्यात आली.
गुंतवणूकदारांना २४ हजार कोटी परत करण्यासाठी या स्थायी मालमत्तेची विक्री करण्यात येणार आहे.