दाऊदच्या प्रॉपर्टीच्या खरेदीदारांची माघार?

कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्रामहिमची जप्त मालमत्ता लिलावात खरेदी करणारे पूर्वाश्रमीचे पत्रकार बालकृष्णन आता चांगलेत अडचणीत आलेत. 

Updated: Jan 7, 2016, 03:22 PM IST
दाऊदच्या प्रॉपर्टीच्या खरेदीदारांची माघार? title=

मुंबई : कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्रामहिमची जप्त मालमत्ता लिलावात खरेदी करणारे पूर्वाश्रमीचे पत्रकार बालकृष्णन आता चांगलेत अडचणीत आलेत. 

पाकमोडिया स्ट्रिटवरच्या दिल्ली जायका हॉटेलसाठी बालकृष्णन ४ कोटी २८ लाखांची बोली लावली. बालकृष्णन यांनी सुरूवातीचे ३० लाख रुपये भरलेही... उरलेले पैसे भरण्यासाठी आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंतची मुदत आहे. पण ही उरलेली रक्कम जमा करताना बालकृष्णन यांची चांगलीच दमछाक होतेय. 

बालकृष्णनं यांनी पैसे भरण्यासाठीची मुदत वाढवून मागितली आहे. पण ही मुदत वाढली नाही, तर बालकृष्णन यांनी आधी भरलेले ३० लाख रुपये पाण्यात जाणार आहेत.

दरम्यान, यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत...

- बालकृष्णन यांनी जेव्हा लिलावात भाग घेतला, तेव्हा त्यांना कुणी आश्वासन आर्थिक दिलं होतं का?

- लिलावानंतर बालकृष्णन यांना काही धमक्याही आल्या होत्या... त्यानंतर त्यांचा निर्णय बदलला का?

- बालकृष्ण यांना मदत मिळून नये म्हणूनही कुणीतरी कारस्थान करतंय का?

- बालकृष्णन यांनी हे सगळं प्रसिद्धीसाठी केलं का?

पाहा, या प्रश्नांवर बालकष्णन यांनी काय उत्तरं दिलीत...