बॉम्बे टॉकीजच्या आगीत सुभाष बाबूंच्या पत्रांची राख

शहरात मागील आठवड्यात शुक्रवारी लागलेल्या आगीत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्रांची राख झाली आहे. ही आग चित्रपट स्टुडिओ 'बॉम्बे टॉकीज'ला लागली होती.

Updated: Jul 2, 2014, 08:03 PM IST
बॉम्बे टॉकीजच्या आगीत सुभाष बाबूंच्या पत्रांची राख title=

मुंबई : शहरात मागील आठवड्यात शुक्रवारी लागलेल्या आगीत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्रांची राख झाली आहे. ही आग चित्रपट स्टुडिओ 'बॉम्बे टॉकीज'ला लागली होती.

बॉम्बे टॉकीजला वीजेच्या शॉर्ट सर्किंटने आग लागली, यात दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट ज्वार भाटा आणि मधुबालाचा पहिला सिनेमा नीलकमल आणि अशोक कुमार यांच्या अनेक चित्रपटांच्या मास्टर प्रिंट जळून खाक झाल्या.

बॉम्बे टॉकीजचे मालक अभय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार नेताजी सुभाष चंद्र बोस आणि रविंद्रनाथ टागौर यांनी लिहीलेली अनेक पत्र यात जळून गेली आहेत.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी अनेक वेळा बॉम्बे टॉकीजचे चालक राजनारायण दुबे यांना अनेक वेळा भारताच्या स्वातंत्र्यासाठी देश भक्तीवर आधारीत गाण्यांची निर्मिती करण्यास सांगितलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.