बंद, बंद, बंद! मेट्रो ३ विरोधात गिरगावकर एकवटले

मेट्रो ३ प्रकल्पाविरोधात आज गिरगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. परिसरातली सर्व दुकानं बंद आहेत... शाळा मात्र सुरू आहेत...  रस्त्यावरील वाहतूकही नेहमीसारखी आहे... पोलिसांचा चोख बंदोबस्त बघायला मिळतोय.... मेट्रो ३ प्रकल्पामुळे इथल्या अनेक चाळी विस्थापित होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात गिरगावकरांनी एल्गार पुकारलाय.

Updated: Mar 18, 2015, 05:26 PM IST
बंद, बंद, बंद!  मेट्रो ३ विरोधात गिरगावकर एकवटले  title=

मुंबई: मेट्रो ३ प्रकल्पाविरोधात आज गिरगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय. परिसरातली सर्व दुकानं बंद आहेत... शाळा मात्र सुरू आहेत...  रस्त्यावरील वाहतूकही नेहमीसारखी आहे... पोलिसांचा चोख बंदोबस्त बघायला मिळतोय.... मेट्रो ३ प्रकल्पामुळे इथल्या अनेक चाळी विस्थापित होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात गिरगावकरांनी एल्गार पुकारलाय.

कय आहे प्रकरण? 
मेट्रो ३चा प्रकल्प हा कुलाबा-सिप्झ-वांद्रे असा आहे. पूर्णपणे भूयारी मार्ग असलेल्या या रेल्वे प्रकल्पात एकूण २७ रेल्वे स्टेशन्स प्रस्तावित आहे. यापैकी एका रेल्वे स्टेशनसाठी गिरगावमधील मराठी भागातील ४-५ इमारतींच्या जागेचा काही भाग मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला हवा आहे. त्या इमारतींमध्ये राहत असलेल्या ७७७ कुटूंबाच्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचा हा वाद आहे. एमएमआरसीनं यांचं पुनर्वसन दुसरीकडे करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. मात्र तसा कोणताही लेखी प्रस्ताव अद्याप देण्यात आलेला नसल्याचं प्रकल्पबाधितांचं म्हणणं आहे.  

या सर्व रहिवाशांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. तर दुसरीकडे यानिमित्तानं मराठी माणसांचा मुद्दा पुढे करुन शिवसेना-मनसेही या वादात पडले आहेत. गिरगावकरांच्या पुनर्वसनाच्या बैठकीतही या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांत वाद झालाय. सत्ताधारी असलेल्या शिवसेनेनं हा बंदला पाठिंबा दिलाय, तर सत्ताधारी असलेल्यांना बंदात सहभागी होण्याची गरज का पडते, असा सवाल मनसेनं उपस्थित केलाय.

तर काँग्रेसनंही या संपाला आपला पाठिंबा व्यक्त करत, कुणाची घरे तोडून विकास नको, असं म्हटलंय.
मात्र या राजकीय साठमारीत गिरगावकारांचा प्रश्न खरचं सुटणार का हा प्रश्न आहेच.. मेट्रो ३ च्या प्रकल्पाच्या नियोजनाप्रमाणे पुर्नवसनाचं कोणतंही लेखी नियोजन राज्य सरकारकडे नाही. शिवाय, या रहिवाशांना किती स्क्वेअर फूटाची घरं मिळणार हेही निश्चित नाही. 

अद्याप एमएमआरसी आणि सरकारनं गिरगाव रहिवाशांपुढे पुनर्वसनाचा एकही प्लॅन ठेवलेला नाही.  शिवाय, रहिवाशांना केवळ गिरगावातच पुनर्वसन हवं आहे. यासाठी सरकार तयार झालं असलं तरी गिरगावात नेमकं कुठे पुनर्वसन करणार याची माहिती लेखी स्वरुपात गिरगावकरांना हवी आहे. केवळ बंदमध्ये सहभागी न होता, हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार आणि  सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.