मुंबई : राज्यातील रेडी रेकनरच्या दरात १४ ते १८ टक्क्यांनी वाढ झालीय. १ जानेवारी २०१५ पासूनच रेडी रेकनरचे हे नवीन दर लागू झालेत. त्यामुळं घरांची स्टॅम्प ड्युडी आणि रजिस्ट्रेशनसाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा रूपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे घरे घेणे महागणार आहे. पर्यायाने घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
पुण्यातमध्ये रेडी रेकनर दरात १४.२ टक्क्यांनी तर मुंबईत १४.८१ टक्क्यांनी वाढ झालीय. औरंगाबादमध्ये १० टक्के, नागपूरमध्ये १०.३० टक्के, नाशिकमध्ये १०.२१ टक्के, अमरावतीत १७.७० टक्के आणि कोकणात १८.८५ टक्के एवढी वाढ झालीय.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुद्रांक व नोंदणी विभागाने रेडी रेकनरच्या दरांत वाढ केली असल्याने बांधकाम क्षेत्रातील सर्व संबंधित घटकांच्या किंमतीत वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे परवडणाऱ्या घराचे 'स्वप्न' आणखी महाग ठरणार आहे. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत रेडी रेकनरच्या दरात सरासरी १४.८ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून काही महत्त्वाच्या भागांत ३० ते ४० टक्क्यांपर्यंतही वाढ करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.