एसटी प्रवास महागणार

सामान्यांचा एसटी प्रवास महागणार आहे.

Updated: Jan 22, 2016, 10:23 PM IST
एसटी प्रवास महागणार title=

मुंबई :  सामान्यांचा एसटी प्रवास महागणार आहे. एसटीत्या तिकिटावर सरसकट एक रुपया अधिभार लावण्यात येणार आहे. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत घोषणा केली.

एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एसटी प्रवाशांसाठी अपघात विम्याची रक्कम आता 10 लाख करण्यात आली आहे. त्याचीच भरपाई अधिभारातून वसूल केली जाणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाबासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त मुंबई सेंट्रल बस स्थानक बंद राहणार आहे. एकही गाडी येथून सुटणार नसल्याने प्रवाशांचे हाल होणार आहे.

बाळासाहेब ठाकरे जयंती : मुंबई सेंट्रल बस स्थानक बंद

तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचा भपकेबाज कार्यक्रम मुंबई सेंट्रलवर आयोजित करण्यात आलाय. विशेष म्हणजे संपूर्ण स्थानक बंद करून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळं पहिल्यांदाच मुंबई सेंट्रल बस स्थानक बंद करून दाखवण्याचा विक्रम शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांनी केलाय.

प्रवाशांना कोणतीही कल्पना न देता तयारीसाठी दुपारपासून अनेक गाड्यांची ये-जा बंद करण्यात आली.