दादांचं तुळशीवृंदावन पावणे दोन लाखांचं, मग...

राज्य कर्जबाजारी असताना आणि दुष्काळासारख्या आपत्तीतही मंत्र्यांच्या बंगल्यांवर त्याच-त्याच कामांसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरील तुळशीवृंदावनाच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक लाख ६९ हजार रुपयांचा खर्च केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 4, 2013, 11:58 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांची रंगरंगोटी आणि दुरुस्तीच्या कामावर लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्य कर्जबाजारी असताना आणि दुष्काळासारख्या आपत्तीतही मंत्र्यांच्या बंगल्यांवर त्याच-त्याच कामांसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोरील तुळशीवृंदावनाच्या दुरुस्तीसाठी तब्बल एक लाख ६९ हजार रुपयांचा खर्च केल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे दरवर्षी मंत्र्यांच्या बंगल्यांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. मात्र, इथंच खरं गौडबंगाल आहे. दरवर्षी तीच-तीच कामे केली जातात. त्यामुळे हा खर्च खरचं आवश्यक आहे का? आणि त्यासाठी एवढा खर्च येतो का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मागील तीन वर्षात मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीवर तब्बल २१ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
राज्यात यंदा भीषण दुष्काळ पडला असताना २०१२-१३ या वर्षी मंत्र्यांच्या बंगल्यांवर कशा प्रकारे खर्च करण्यात आला आहे, त्यावर नजर टाकली तर आपल्याला धक्का बसेल.
पाहुयात कुणी केलाय किती खर्च
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (निवासस्थान वर्षा) :
दुरुस्तीसाठी ३३ लाख ५ हजार खर्च
उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी) :
रंगरंगोटीसाठी - ३ लाख ७३ हजार
आवारातील तुळशी वृंदावनाच्या दुरुस्तीसाठी - १ लाख ६९ हजार
गेस्ट हाऊससाठी तर कॅन्टींन, सेवक निवासस्थान रंगरंगोटीसाठी – ४ लाख
अशा प्रकारे अजितदादांच्या देवगिरी निवासस्थानावर दुष्काळी वर्षात ३८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

छगन भुजबळ, सार्व. बांधकाम मंत्री (रामटेक)
अंतर्गत रंगरंगोटी – ३ लाख ५५ हजार आणि इतर खर्च मिळून ४ लाख ४६ हजार खर्च करण्यात आले आहेत.
बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री (सेवासदन)
अंतर्गत रंगरंगोटी – ३ लाख ६७ हजार आणि इतर खर्च मिळून ९ लाख १० हजार
सुनील तटकरे, जलसंपदा मंत्री (मेघदूत)
अंतर्गत रंगरंगोटी – ५ लाख ४० हजार आणि इतर खर्च मिळून १८ लाख ३८ हजार
राधाकृष्ण विखे-पाटील, कृषीमंत्री (सागर)
अंतर्गत रंगरंगोटी – ४ लाख ९८ हजार आणि इतर खर्च मिळून १२ लाख ३ हजार
सुरेश शेट्टी, आरोग्य मंत्री
अंतर्गत रंगरंगोटी – ३ लाख ५४ हजार आणि इतर खर्च मिळून
पद्माकर वळवी, क्रीडामंत्री (सदनिका, रॉकी हिल)
अंतर्गत रंगरंगोटी – ३ लाख ५० हजार
दिलीप वळसे-पाटील, विधानसभा अध्यक्ष (शिवगिरी)
अंतर्गत रंगकाम – ३ लाख २४ हजार आणि इतर खर्च मिळून १२ लाख १८ हजार

बंगल्यांच्या दुरुस्तीवरील मागील तीन वर्षांच्या आकडेवारी नजर टाकली तर...
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (वर्षा) – ७३ लाख १५ हजार
उपमुख्यमंत्री अजित पवार (देवगिरी) - ५९ लाख ३ हजार
गृहमंत्री आर. आर. पाटील (चित्रकूट) - ६८ लाख ९६ हजार
तर मागील तीन वर्षात सर्वात जास्त खालील पुढील मंत्र्यांच्या बंगल्यांवर सर्वात जास्त खर्च झाला आहे
सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (पर्णकुटी) – १ कोटी १७ लाख ७८ हजार
विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील (शिवगिरी) – १ कोटी १७ लाख ८९ हजार
जलसंपदा मंत्री सुनील तटकरे (मेघदूत) - १ कोटी १६ लाख ९३ हजार
यात सगळ्यात कहर म्हणजे रिक्त असलेल्या बंगल्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्तीसाठी ६ लाख १० हजार रुपये खर्च केलेला आहे. सत्ताधारी पक्षाने मात्र या सर्व खर्चाचं समर्थनच केलंय, तर विरोधी पक्षांनी नेहमीप्रमाणे या खर्चाच्या तपासाची चौकशी करण्याची मागणी केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.