सोनीपूर नरसंहार प्रकरणातील तीन उग्रवाद्यांना नवी मुंबईत अटक

आसमच्या सोनीपूर इथं ७४ जणांच्या नरसंहार प्रकरणातील तीन उग्रवाद्यांना महाराष्ट्र एटीएसनं नवी मुंबई इथून अटक केलीये. 

Updated: Apr 4, 2015, 12:50 PM IST
सोनीपूर नरसंहार प्रकरणातील तीन उग्रवाद्यांना नवी मुंबईत अटक title=

नवी मुंबई: आसमच्या सोनीपूर इथं ७४ जणांच्या नरसंहार प्रकरणातील तीन उग्रवाद्यांना महाराष्ट्र एटीएसनं नवी मुंबई इथून अटक केलीये. 

गेल्या वर्षभरापासून हे नवी मुंबई राहत असून, तळोजा इथल्या एका कोल्ड स्टोअरेजमध्ये काम करत होते. सोंगा बसुमतारी वय २२ वर्षे, स्वामख्वार बसुमतारी वय २० वर्षे ,पूर्णो नर्जरी वय १९ अशी या तिघांची नावं आहेत.

तिघाना आज न्यायालयात हजर केलं जाणार असून, लवकरच त्यांचा ताबा आसाम पोलिसांना दिला जाईल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.