नव्या मतदार यादीत ११ लाख मतदारांची नाव कमी झाली

मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये कधी नव्हे इतके घोळ आज दिवसभर बघायला मिळतोय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 21, 2017, 05:27 PM IST
नव्या मतदार यादीत ११ लाख मतदारांची नाव कमी झाली title=

मुंबई : मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये कधी नव्हे इतके घोळ आज दिवसभर बघायला मिळतोय..पाच वर्षांपूर्वीच्या मतदारांच्या संख्येपेक्षा तब्बल ११ लाख मतदारांची नावं यंदाच्या सुधारीत मतदार यांद्यामध्ये कमी असल्याचं समोर आलंय. 

२०१२च्या १ कोटी २ लाख ८६ हजार ५७९ मतदार होते. पण यंदाच्या मतदार यादीत ९१ लाख ८० हजार ४९१ मतदार आहेत. त्यामुळे मतदार यादीतील ११ लाख लोकांची नावं कमी आहेत. याप्रकरणी शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे.