मुंबई : कुर्लातल्या सीटी किनारा हॉटेलमध्ये झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर बीएमसीनं कारवाईचा बडगा उगारलाय. या कारवाईत मुंबईतल्या अनेक बड्या हॉटेलमध्ये सदोष अग्निशमन यंत्रणा असल्याचं पुढे आलंय.
अधिक वाचा : मुंबईत सिलिंडरचा स्फोट, आठ ठार
दोन दिवसात दोनशेहून अधिक हॉटेल्सवर कारवाई केलीय. त्यात बहुतांश हॉटेल्सनीमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याचं उघड झालंय. या कारवाईत बीएमसीनं पहिला दर्जा दिलेल्या काही हॉटेल्सचा समावेश आहे.
या हॉटेलात यंत्रणा नाही...
दादरमधलं जिप्सी, ताडदेवचं सरदार पावभाजी, दिल्ली दरबार, लाइम अॅण्ड स्पाईस, नानुमल भोजनालय,यू ग्रॅण्ट हॉटेल, कोहिनूर हॉल अॅण्ड बँक्वेट, डॉमिनोज पिझ्झा, चंद्रगुप्त, चायना स्पाइस, मालाडमधलं एम. एम. मिठाईवाला यांच्याविरुद्ध पालिकेने कारवाई केली. यापैकी काही हॉटेल्सने पदपथावर अतिक्रमण केले होतं, तर काहींनी परवानगीविना अंतर्गत बदल केले होते.
अधिक वाचा : मुंबईत दुसऱ्या दिवशी आणखी एक सिलिंडर स्फोट, ८ जखमी
कुर्ल्यातल्या बेकायदा हॉटेलमध्ये झालेल्या स्फोटानं ८ निष्पाप जिवांचा बळी गेला. आतापर्यंत अशा हॉल्सकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणा-या प्रशासनानं तातडीनं शहरातील सर्व हॉटेलच्या परीक्षणाचे आदेश काढले आणि एकाच दिवसात पन्नासहून अधीक हॉटेलवर कारवाई केली. मात्र पालिका प्रशासनाची ही कारवाई केवळ शोभेचीच म्हणावी लागेल.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.