राणेंकडून 'शिववडा' हायजॅक.... 'स्वाभिमान वडा' लॉन्च!

शिवसेनेच्या शिववड्याला मुंबईत आव्हान उभ ठाकलंय. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी स्वाभिमान संघटनेनं ते निर्माण केलंय. राणेंचा स्वाभिमान वडा आज लॉन्च झालाय.

Updated: May 7, 2015, 08:15 PM IST
राणेंकडून 'शिववडा' हायजॅक.... 'स्वाभिमान वडा' लॉन्च! title=

मुंबई : शिवसेनेच्या शिववड्याला मुंबईत आव्हान उभ ठाकलंय. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी स्वाभिमान संघटनेनं ते निर्माण केलंय. राणेंचा स्वाभिमान वडा आज लॉन्च झालाय.

काँग्रेसचे युवा आमदार नितेशराव राणे सध्या दणक्यात आहेत. वडील नारायणराव राणेंप्रमाणेच त्यांनीही शिवसेनेला अंगावर घेण्यास सुरुवात केलीय. सध्या त्यांच्या निशाण्यावर आहे 'शिववडा'... शिववड्याचं परप्रांतीय कनेक्शन चव्हाट्यावर आणल्यावर, आता त्यांनी थेट ही स्किमच हायजॅक करायचा निर्धार केलाय. त्यासाठी 'स्वाभिमान' वडा हा नवा ब्रॅण्ड तयार करण्यात आला. 

आज परळ येथील एल्फिस्टन रो़ड स्टेशनच्या नाक्यावर स्वाभिमान वड़्याची पहिली गाडी सुरु झाली. मुंबईत आता स्वाभिमान वडा शिववड्याला भिडणार आहे.

शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष महाराष्ट्राला नवा नाही. सिंधुदुर्गानंतर तो मुंबईतल्या वांद्र्यातही दिसला. गेल्या दहा वर्षांत राजकारणापासून सुरु झालेला हा संघर्ष आता वड्यावर येऊन ठेपलाय, असं म्हटलं जातं, चवीनं खाणार त्याला देव देणार... आता तर मुंबईत वडापावही स्वाभिमानानं खाण्याचा सल्ला दिला जातोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.