सलमान खानला का मिळाला अंतरिम जामीन?

2002च्या हिट अँड रन प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टानं पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्याच्या काही तासांमध्येच हायकोर्टातून सलमान खानला जामीन मिळाला. सलमानला मिळालेल्या याच जामीनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल केली गेलीय.

Updated: May 7, 2015, 02:46 PM IST
सलमान खानला का मिळाला अंतरिम जामीन? title=

नवी दिल्ली: 2002च्या हिट अँड रन प्रकरणी मुंबई सेशन्स कोर्टानं पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्याच्या काही तासांमध्येच हायकोर्टातून सलमान खानला जामीन मिळाला. सलमानला मिळालेल्या याच जामीनाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आज याचिका दाखल केली गेलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वकील अखिलेश चौबे यांनी आज सुप्रीम कोर्टात सलमान खानला लवकर जामीन दिल्याच्या विरोधात याचिका दाखल केलीय. या याचिकेत मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात अपिल केलं गेलंय आणि सुप्रीम कोर्टातून सलमानचा अंतरिम जामीन रद्द करण्याची मागणी केली गेलीय. याचिकेत सलमानच्या अंतरिम जामीनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. 

का मिळाला सलमानला जामीन?

सलमानला दोषी ठरवल्याच्या विस्तृत आदेशाची प्रत सेशन्स कोर्टातून त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती म्हणून हायकोर्टाचे न्यायाधीश अभय ठिपसे यांनी सलमानला अंतरिम जामीन मंजूर केला. 

सलमान खानकडून त्याचे वकील हरीश साळवे यांनी हायकोर्टासमोर हा युक्तीवाद मांडला की, सेशन्स कोर्टाच्या आदेशाची प्रत मिळाली नाहीय म्हणून सलमानला जामीन द्यावा? साळवे यांच्या युक्तीवादाचा विरोध करत सरकारी वकील संदीप शिंदे यांना सांगितलं की, कायद्याअंतर्गत हाय कोर्टानं विस्तृत आदेशाची प्रत न मिळताच जामीन अर्जावर सुनावणी करू नये. ते म्हणाले, आरोपीनं आपल्या अपीलामध्येच आदेशाची प्रत लावायला हवी होती. हे कायद्यानुसार गरजेचं आहे. मात्र सलमानचे वकील हरीश साळवे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती ठिपसे यांनी सलमानचा जामीन मंजूर केला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.