शिवसेना- भाजप मध्ये पुन्हा जुंपली

 मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं होतं. हळद लागलेल्यांना सत्ता स्थापनेची स्वप्नं पडत असली तरी पालिका आणि विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला होता.

Updated: Jan 24, 2016, 10:27 PM IST
शिवसेना- भाजप मध्ये पुन्हा जुंपली title=

मुंबई मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं होतं. हळद लागलेल्यांना सत्ता स्थापनेची स्वप्नं पडत असली तरी पालिका आणि विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला होता.

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर 'ज्यांना कावीळ झालीय त्यांना सर्व काही पिवळं दिसतं. शिवाय मुंबईत भाजपच एक नंबरचा पक्ष असून भविष्यातही भाजपच एक नंबरचा पक्ष राहिलं' असं  जोरदार प्रत्युत्तर भाजप नेते आशिष शेलार यांनी त्याला दिलंय.