शिवसैनिकांचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा

शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या नवी मुंबईतल्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक तर ठाण्यात कार्यालयात शाई फेकण्याचा प्रकार घडलाय. सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल छापलेल्या व्यंगचित्रावरून वाद निर्माण झालाय. त्याचं पर्यवसन सामनाच्या आस्थापनांवरील हल्ल्यात झालंय.

Updated: Sep 27, 2016, 04:59 PM IST
शिवसैनिकांचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा title=

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या नवी मुंबईतल्या प्रिंटींग प्रेसवर दगडफेक तर ठाण्यात कार्यालयात शाई फेकण्याचा प्रकार घडलाय. सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल छापलेल्या व्यंगचित्रावरून वाद निर्माण झालाय. त्याचं पर्यवसन सामनाच्या आस्थापनांवरील हल्ल्यात झालंय.

अल्टो कारमधून आलेल्या चौघांनी प्रथम संभाजी ब्रिगेडच्या लेटरहेडवर छापलेलं निवेदन सुरक्षा रक्षकाकडे दिलं आणि जाताना दगडफेक केली. निवेदनात सामनामध्ये आलेल्या व्यंगचित्रांचा निषेध केला आहे, तर शिवसैनिकांनी या घटनेचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय.दुसरीकडे ठाण्यातील नितीन कंपनी जवळील श्रीजी आर्केड इमारतीत पहिल्या मजल्यावर असलेल्या दैनिकाच्या कार्यालयावर अज्ञात इसमांनी शाई फेकली.