मुंबई : मुंबईतल्या शिवाजी पार्कसह राज्यातली सर्व मैदाने राजकीय सभांसाठी खुली करण्यात आली आहे. राज्य सरकारनं एमआरटीपी कायद्यात बदल केल्यामुळं शिवाजी पार्कवरील राजकीय सभा घेण्याचा मार्ग मोकळा झालाय.
यापूर्वी शिवाजी पार्कवर वर्षातील तीस दिवस केवळ धार्मिक कार्यक्रम घेण्यास परवानगी होती. मात्र यापुढं वर्षभरात ४५ दिवस मैदान वापरण्यास परवानगी देण्यात आली असून त्यात राजकीय सभांचा समावेश करण्यात आलाय. यामुळं आता शिवाजी पार्कवर राजकीय तोफा धडाडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
शिवाजी पार्क सायलेंस झोन म्हणून जाहीर झाल्यानंतर हायकोर्टानं या मैदानात राजकीय सभा घेण्यास मनाई केली होती. त्यामुळं राजकीय पक्षांची मोठी अडचण झाली होती. मात्र आता थेट कायद्यातच बदल करण्यात आल्यामुळं शिवाजी पार्कसह राज्यातली सर्वच मैदानं राजकीय सभांसाठी खुले झाले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.