कट्टर राणे समर्थक मातोश्रीवर, शिवसेनेत करणार प्रवेश

कट्टर नारायण राणे समर्थक काँग्रेसचेचे पदाधिकारी रवींद्र फाटक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा राणेंना मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे. फाटक हे सोमवारी सेनेत प्रवेश करणार होते. मात्र, ते आज शिवसेनेत प्रवेश करणार  आहेत. फाटक हे मातोश्रीवर दाखल झाले आहे.

Updated: Jul 19, 2014, 11:11 AM IST
कट्टर राणे समर्थक मातोश्रीवर, शिवसेनेत करणार प्रवेश title=

मुंबई : कट्टर नारायण राणे समर्थक काँग्रेसचेचे पदाधिकारी रवींद्र फाटक शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. हा राणेंना मोठा हादरा असल्याचे बोलले जात आहे. फाटक हे सोमवारी सेनेत प्रवेश करणार होते. मात्र, ते आज शिवसेनेत प्रवेश करणार  आहेत. फाटक हे मातोश्रीवर दाखल झाले आहे.

रवींद्र फाटक हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. काँग्रेसच्या सात नगरसेवकांसह ते शिवसेनेध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. रवींद्र फाटक, जयश्री फाटक, कांचन चिंदरकर, राजा गवारी, मिनल संख्ये आणि दीपक वेसकर हे प्रवेश करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, रवींद्र फाटक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी ते मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांविरोधात बंड करणा-या नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली होती. बाळासाहेबांचा सर्वात जास्त छळ उद्धव ठाकरेंनी केला. बाळासाहेबांचं नाव घ्यायची उद्धव यांची लायकी नाही, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर उद्धव यांनी राणेना धक्का देण्याचे ठरविले आहे. राणेंचे कट्टर समर्थक रवींद्र फाटक यांना सेनेत प्रवेश देण्याचे संकेत दिलेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.