शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्वाच्या बाबी

शिवसेनेने भाजपाशी युती होण्याआधीच वचननामा प्रकाशित केला आहे, यावर बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून हा वचननामा प्रकाशित करण्यात आला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 23, 2017, 02:08 PM IST
शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्वाच्या बाबी title=

मुंबई : शिवसेनेने भाजपाशी युती होण्याआधीच वचननामा प्रकाशित केला आहे, यावर बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून हा वचननामा प्रकाशित करण्यात आला.

भाजपकडून वचनाम्यासाठी काही चांगल्या गोष्टी सूचवण्यात आल्या तर समावेश करण्यात आले. पाहा काय आहेत वचननाम्यातील महत्वाच्या गोष्टी

मुंबई महापालिका | शिवसेनेचा वचननामा | 

  • महापालिकेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना महापालिकेच्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य
  • आरेचा आरक्षित हरितपट्टा कायम राखणार
  • मुंबईत स्वच्छता गृहांची संख्या वाढवणार
  • वृक्षसंवर्धनासाठी कटीबद्ध राहणार
  • मुंबईतील जुन्या विहिरीचं पुनर्रज्जिवित करणार
  • मुंबई मनपा स्वत:चं  हक्काचं वीज केंद्र उभारणार
  • खड्ड्यांचा प्रश्न निकाली काढू
  • मुंबईच ई-वाचनालंय उभारणार
  • चार मोठे जलतरण तलाव उभारू
  • डबे वाल्यांसाठी डबेवाला भवन उभारू
  • जेनरिक मेडिसीन वाढवण्यावर भर
  • मुलींसाठी आत्मरक्षण केंद्र  उभारणार
  • पालिकांमध्ये दर्जेदार, पौष्टीक भोजन
  • मुंबईतील सर्व स्थानकांजवळ दुचाकी स्टँड उभारणार
  • नॅशनल पार्कमधून गोरेगाव-मुलुंड मार्ग काढणार
  • शेतकऱ्यांना थेट शेतीमाल विकण्यासाठी केंद्र उभारू
  • मुंबईतील महिलांसाठी सॅनेटरी नॅपकिन पुरवणार
  • बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही