भाजपाशी युती बाबत बोलणी सुरू - उद्धव ठाकरे

शिवसेनेची भाजपाशी मुंबई महापालिकेत जागावाटपावरून चर्चा सुरू असताना, युती होण्याआधीच शिवसेनेकडून महापालिकेसाठी वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 23, 2017, 01:54 PM IST
भाजपाशी युती बाबत बोलणी सुरू - उद्धव ठाकरे title=

मुंबई : शिवसेनेची भाजपाशी मुंबई महापालिकेत जागावाटपावरून चर्चा सुरू असताना, युती होण्याआधीच शिवसेनेकडून महापालिकेसाठी वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून शिवसेनेने वचननामा प्रकाशित केला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी युतीबाबत बोलताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, 'भाजपाशी युतीबाबत बोलणी सुरू आहे, युती झाल्यास भाजपाच्या सूचनांचा विचार करू'. यावेळी वचननाम्यात नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.